समर्थ रामदासस्वामींच्या कार्याबद्दल व त्यांनी निर्मिलेल्या जीवन व्यवहार विषयक साहित्य संपदेबद्दल अनेक विद्वानांनी भाष्य केलेले आहे. समर्थांनी हिंदूत्व जीवन व्यवहार आणि समाज धारणेकरिता लागणारे तत्वज्ञान आपल्या ग्रंथातून विषद केले त्याच प्रमाणे त्यांनी ते स्वतः आचरणातही आणले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्र हे त्यांचे आदर्श, समर्थांनी बलोप...